Saturday, October 10, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

चिल्लर खुरदा काय कामाचा ?

विशेष लेख

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
August 13, 2024
in राजकारण, विशेष लेख, हिंगोली
0
चिल्लर खुरदा काय कामाचा ?
0
SHARES
1.2k
VIEWS

स्वर्गीय खा. राजीव सातव यांनी अल्पावधीमध्ये राजकारणात आपले स्वतंत्र वलय निर्माण केले होते. अर्थातच हे वलय निर्माण करताना त्यांचे राजकीय वितुष्ट निर्माण होणे अपेक्षित होते. परंतु आश्चर्याची बाब ही होती की सातवांचे वितुष्ट हे स्वपक्षातील नेत्यांसोबतच निर्माण झाले. ज्यामध्ये माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यापासून ते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यापर्यंत हा विरोध येऊन ठेपला होता.
इतर पक्षातील नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध ठेवणाऱ्या सातवांना स्वपक्षातीलच या नेत्यांचे वावडे का ? हा शेवटपर्यंत न सुटलेला प्रश्न होता. सातव यांच्या झालेल्या दुर्दैवी अकाली निधनामुळे जिल्ह्यात निश्चितच एक राजकीय पोकळी निर्माण झाली होती. परंतु सातव यांच्या निधनानंतर विशेषतः कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झाले होते ? राजीव सातव यांच्या मातोश्री रजनीताई सातव ह्या वयोमानामुळे राजकारणापासून दूर होत्या. तर प्रज्ञाताई सातव यांना काँग्रेसने विधान परिषदेची जबाबदारी देऊन त्यांच्या राजकीय वाटचालीची भक्कम सुरुवात देखील करून दिली होती. परंतु राजीव सातव यांनी ज्या पद्धतीने मतदारसंघात आणि जिल्ह्यामध्ये माणसे जोडली होती ती माणसे टिकविण्यात प्रज्ञाताई सातव यांना अपयश येत गेले.
काही दिवसांपूर्वी हिंगोली येथे झालेल्या पक्षाच्या किंवा त्यांच्या स्वतंत्र गटाच्या बैठकीच्या अनुषंगाने प्रज्ञा सातव यांनी अप्रत्यक्षपणे गोरेगावकर गटावर चिल्लर खुरदा असा टोमणा मारत खिल्ली उडवली होती. वास्तविक केवळ सहानुभूतीच्या मुद्द्यावर दुसऱ्यांदा विधानपरिषद मिळविणाऱ्या प्रज्ञाताई सातव यांना त्यांच्या होम पीच वरील महत्त्वाचे ‘रोख’ नेते आणि कार्यकर्ते सांभाळता आली नाहीत. तर दुसऱ्यांवर चिल्लर खुरदा टिप्पणी करून काय साध्य झाले ? असा प्रश्न अधोरेखित होत आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर सर्वप्रथम त्यांचे निकटवर्ती असलेले माजी आमदार संतोष टार्फे यांनी प्रज्ञाताई सातव यांच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून काँग्रेसला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेची वाट धरली. टारफे यांच्यानंतर काँग्रेसला या मतदारसंघात जणू गळतीच लागली. सातव यांचे समर्थक व माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, केशव नाईक, धनंजय सूर्यवंशी, एस पी राठोड, सुधीर राठोड, कैलास सोळंके, ओम कदम, बापूराव घोंगडे, अभय सावंत, फारुकी अशी जवळपास दोन डझन महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची यादी सातव यांच्या जमेच्या बाजूतून वजा झाली. गेलेल्या प्रत्येक नेते किंवा कार्यकर्त्याबद्दल त्यांना फारसे काही वाटले नाही. स्वतःची होम पीच असणाऱ्या मतदारसंघात पूर्ण पक्ष रिकामा होत असताना प्रज्ञाताई सातव यांनी केवळ हिंगोली विधानसभेत गोरेगावकरांचा विरोध करण्याकडे लक्ष दिले. गेल्या काही महिन्यात हिंगोली विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या वाढली. काही महिन्यांपूर्वीच जी मंडळी सातव यांच्यापासून लांब जात तिसरा गट निर्माण करून बसली होती. तीच मंडळी केवळ गोरेगावकरांचा विरोध म्हणून सातव यांच्या झेंड्याखाली पुन्हा दुसऱ्या गटात सहभागी झाली. जिल्हास्तरावरील पक्षाचे नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून प्रज्ञा सातव हिंगोली विधानसभेत लक्ष घालू लागल्या असे दाखवत असताना प्रत्यक्षात मात्र त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात काँग्रेसचा खालसा झाला आहे. त्यांचेच समर्थक असलेले दस्तूर खुद्द जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई देखील गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यापासून चार हात लांब आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवणाऱ्या प्रज्ञा सातव यांच्या भूमिकेबद्दल देखील त्यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. संघटन क्षेत्रात फारसा कुठलाही प्रभाव नसतानाही गांधी परिवाराने केवळ सहानुभूतीच्या मुद्द्यावर दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी दिली. याच संधीमुळे गोरेगावकर विरोधक त्यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झाले आहेत. परंतु ज्या गोरेगावकरांचा सातव यांनी चिल्लर खुरदा उल्लेख केला त्याच गोरेगावकरांच्या विरोधात जमा झालेली चिल्लर सोबत घेऊन पक्षांतर्गत विरोधाचे राजकारण सातव यांचे नेतृत्व मोठे करणार की केवळ विरोधाच्या राजकारणात गुरफटवून टाकणार यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. पाच-पन्नास कार्यकर्ते सोबत घेऊन हिंगोली विधानसभेत सातव समर्थकांच्या चिल्लरचा मोठा खळखळाट ऐकावयास मिळत आहे. परंतु ही मंडळी वैयक्तिकरित्या सातव यांचे नेतृत्व प्रबळ करण्यासाठी कितपत कामाचे आहेत याचा विचार स्वतः सातव यांनी देखील केलेला नसावा. कारण केवळ गोरेगावकर यांना विरोध म्हणून जमा झालेल्या चिल्लरची राजकारणातील ‘रोखी’च्या बाजारात काय किंमत असणार हे वेगळे सांगायची गरज नाही. स्वतःच्या क्षमता न ओळखता विधानसभेतील उंटाच्या उमेदवारीचा मुका घेण्याचे स्वप्न बघणारे सातव यांचे नेतृत्व काय उभे करणार ? असा सवाल देखील या निमित्ताने निर्माण होत आहे.

Tags: #pradnya_satav#प्रज्ञा_सातव#भाऊराव_पाटील_गोरेगावकर#हिंगोली_विधानसभा
Previous Post

रामदास पाटलांच्या संकल्पपत्रामुळे राजकारणात खळबळ !

Next Post

हिंगोलीचे नवे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
हिंगोलीचे नवे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

हिंगोलीचे नवे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!