हिंगोली-
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक विकास निधीतून पांदन रस्ता मंजूर करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजीराव मुटकुळे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करून भेट दिली असता ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये पांदण रस्त्यांची समस्या कायम होती. ज्याबाबत गांभीर्याने दखल घेऊन आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी स्थानिक विकास निधीतून गावांच्या पांदण रस्त्यांचे कामे मंजूर केली होती. यातीलच सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे पांदण रस्ता मंजूर करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आज शिवाजीराव मुटकुळे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला. आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी पांदण रस्त्याचा शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला अशी भावना व्यक्त करीत गावकऱ्यांनी शिवाजीराव मुटकुळे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासह तालुका अध्यक्ष हिम्मत राठोड, विजयराव धाकतोडे, दिग्विजय खाडे, शुभम खाडे व जयपूर येथील गवकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्तित होते.












