Saturday, October 10, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

देशमुखांच्या सलगीमुळे इच्छुकांच्या पोटात गोळा !

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
September 5, 2024
in राजकारण, हिंगोली
0
देशमुखांच्या सलगीमुळे इच्छुकांच्या पोटात गोळा !
0
SHARES
323
VIEWS

हिंगोली- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी काँग्रेस नेते अमित देशमुख हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याप्रसंगी त्यांनी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या सोबत दाखविलेली सलगी पक्षातील इच्छुकांच्या पोटात गोळा निर्माण करणारी ठरली आहे.
स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यातील सख्ख्य सर्वश्रुत आहे. विलासराव देशमुख यांचे मराठवाड्यातील सर्वात खंदे समर्थक म्हणून भाऊराव पाटील गोरेगावकर ओळखले जात होते. विलासरावांच्या मृत्यूनंतर मराठवाड्यातील काँग्रेसची धुरा बहुतांशपणे अशोक चव्हाण यांच्याकडे आली होती. परंतु लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी भाजपचा रस्ता धरला आणि मराठवाड्यातील काँग्रेसची सूत्रे पुन्हा लातूरच्या देशमुख घराण्याकडे आली. त्यातूनच अमित देशमुख यांना काँग्रेसने मराठवाड्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी देखील दिली आहे. हिंगोली विधानसभेमध्ये सध्या काँग्रेसमध्ये इच्छुकांचे पेव फुटले आहे. यामध्ये ताकदीने निवडणूक लढवून जिंकून येण्याच्या महत्त्वकांक्षा पेक्षा केवळ गोरेगावकरांची उमेदवारी रद्द करण्यासाठीची धडपड अधिक दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत असलेल्या अमित देशमुख यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले होते. हिंगोलीतील आपल्या पूर्ण दौऱ्या दरम्यान अमित देशमुख यांनी इच्छुकांच्या गर्दीला सारून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासोबत दौरा केला. एवढेच नव्हे तर गोरेगावकर यांचे निवासस्थानी भोजन देखील स्वीकारले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गोरेगावकर यांचा काँग्रेसचे नेते म्हणून उल्लेख केला तर जिल्ह्यातील गटबाजीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी गटबाजीच्या चर्चेचे खापर माध्यमांवर फोडून टाकले. असे असले तरीही अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख यांची परंपरा चालवीत गोरेगाव यांच्याशी दाखविलेली सलगी इच्छुकांच्या मात्र पोटात गोळा आणणारी ठरली आहे.

Tags: #congres#भाऊराव_पाटील_गोरेगावकर#हिंगोली_विधानसभा
Previous Post

वैद्यकीय महाविद्यालयासाठी हिंगोलीकर आक्रमक

Next Post

सोमवारी सिंचन संघर्ष समितीचा ट्रॅक्टर मोर्चा

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
सोमवारी सिंचन संघर्ष समितीचा ट्रॅक्टर मोर्चा

सोमवारी सिंचन संघर्ष समितीचा ट्रॅक्टर मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!