हिंगोली- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतराचे सत्र अजूनही थांबलेले नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हा चिटणीस तथा पतंजलीच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीताई वाघमारे यांच्यासह अनेकांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातून शिवसेनेत प्रवेश करण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये आज भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाचिटणीस ज्योतीताई वाघमारे यांच्या सह शारदाताई पवार, महानंदाताई धबाले, सुनीताताई वाघमारे अनिताताई शेळके यांच्यासह नागेश बांगर, दीपक पैलवान, हेमंत साहू, रायचंद जैन, अजित भाई, कलाम भाई, एनियत खा, जमीर भाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह हिंगोलीचा रणजी क्रिकेट खेळाडू सनी पंडित, युवासेना प्रमुख राम कदम, केशव महाराज दुबे यांची प्रमुख उपस्थिती होती.












