Sunday, October 11, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसची पदयात्रा

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
March 7, 2026
in प्रशासन, महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसची पदयात्रा
0
SHARES
58
VIEWS

हिंगोली- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह जिल्ह्यातील अनेक प्रश्नांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 9 मार्च रोजी कळमनुरी येथील लमानदेव येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेचा समारोप हिंगोली येथील गांधी चौक परिसरात भव्य सभेमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा निरीक्षक साहेबराव कांबळे यांनी दिली.
मोदी सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे शेतकरी बांधवांवर अन्याय होणार असून सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, डेअरी प्रॉडक्ट, लघुउद्योग यांचे भाव कोसळणार आहेत. त्यामुळे अमेरिकेसोबत केलेला करार रद्द करण्यात यावा. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदिवासी विशेष पदभरती तात्काळ करून १२५०० जागा भराव्यात. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा. शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर पडलेला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर पडलेला नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये पांदण रस्ते, सिंचन विहिरी, गोठे व इतर रोजगार हमी योजनेची कामे राज्यात थांबविण्यात आलेले आहेत, त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व योजना चालू ठेवण्यात याव्यात. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करून वनपट्टी धारकांची नावे जमिनी कराव्यात. कयाधू नदीचे पाणी वळवून इसापूर धरणामध्ये सोडण्यात येणार आहे, यामुळे कयाधू नदीकाठच्या गावांना तीव्र पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे कयाधू नदीचे पाणी वळविण्याचा हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. औंढा तालुक्यातील बोरजा फाटा ते लिगो प्रकल्प हा रस्ता ऐंशी फुटाचा होत आहे. जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. कळमनुरी तालुक्यातील रामवाडी मुंडळ उपसा जलसिंचन योजनेला तात्काळ मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे. पीक विमा सरसकट शेतकरी बांधवांना देण्यात यावा. कर्जमाफीचे आश्वासन शासनाने पाळावे, कर्जमाफी तात्काळ करावी. पीक कर्ज वाटप दरवर्षी १००% झाले पाहिजे. या मागण्यांसाठी कळमनुरी येथून पदयात्रा तिच्यासमोर हिंगोली येथील गांधी चौक परिसरात करण्यात येईल.
या पत्रकार परिषदेला सचिन नाईक, सुरेश अप्पा सराफ, डॉक्टर रमेश शिंदे, मिलिंद उबाळे, एकनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: #congres_hingoli#Harshvardhan_Sapkal
Previous Post

वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी भरती गोत्यात ?

Next Post

सपकाळांची खीर आणि नेत्यांचे दूध !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
सपकाळांची खीर आणि नेत्यांचे दूध !

सपकाळांची खीर आणि नेत्यांचे दूध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!