Wednesday, October 7, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

हिंगोली ‘व्हिजन २०४७’ साठी पालकमंत्र्यांकडे पत्रकार संघाची मागणी

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
September 9, 2026
in प्रशासन, महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
हिंगोली  ‘व्हिजन २०४७’ साठी पालकमंत्र्यांकडे पत्रकार संघाची मागणी
0
SHARES
76
VIEWS

​हिंगोली:
हिंगोली जिल्ह्याच्या दीर्घकालीन आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘व्हिजन २०४७’ या विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणाबाबत व वेळ मिळण्याबाबत पत्रकार संघाच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबई येथे राज्याचे पालकमंत्री नामदार नरहरीजी झिरवाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
​पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देश व राज्य पातळीवर २०४७ च्या विकसीत भारताचा आराखडा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्याचाही आगामी वर्षांतील विकासाचा आराखडा तयार व्हावा, या उद्देशाने पत्रकार संघाने हा पुढाकार घेतला आहे. यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाने ‘व्हिजन २०२०’ उपक्रम यशस्वीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाच्या विविध संकल्पना संकलित केल्या होत्या.
​आता ‘व्हिजन २०४७’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय संघटना तसेच विकासप्रेमी नागरिकांना एकाच मंचावर आणून त्यांच्याकडून हिंगोलीच्या प्रगतीबाबत संकल्पना जाणून घेतल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आणि उद्घाटनासाठी पालकमंत्र्यांनी तारीख व वेळ द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
​मुंबई येथील या भेटीदरम्यान जिल्ह्यातील विकासासंदर्भात संकलित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पण्यांची प्रत पालकमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आली. निवेदनाची दखल घेत, जिल्ह्याच्या दीर्घकालीन नियोजनासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगत लवकरच या कार्यक्रमासाठी वेळ निश्चित केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री ना. नरहरीजी झिरवाळ यांनी दिले.
​या प्रसंगी हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे परिषद प्रतिनिधी नंदकिशोर तोष्णीवाल, कार्याध्यक्ष वसंत भट, तसेच ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे (लोकसत्ता), शिवाजी मेटकर (दै. देशोन्नती), मकरंद बांगर (नवभारत व नवराष्ट्र), प्रद्युम्न गिरीकर (न्यूज माध्यम), श्याम सोळंके (पुण्यनगरी) आणि वत्सल दगडू (गाववाला) हे उपस्थित होते.

Tags: #Narhari_Zirval
Previous Post

चेस क्लब हिंगोलीला बेस्ट अकॅडमीचा बहुमान

Next Post

पिके जगविण्यासाठी सुरळीत वीजपुरवठा करा- शिवाजीराव मुटकुळे

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
पिके जगविण्यासाठी सुरळीत वीजपुरवठा करा- शिवाजीराव मुटकुळे

पिके जगविण्यासाठी सुरळीत वीजपुरवठा करा- शिवाजीराव मुटकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!