हिंगोली- जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये शासनाने अतिवृष्टी मान्य केली असून त्या संदर्भातचे पिक विमा मावेजा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. सदर रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हिंगोली येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तोबा गर्दी केल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच तारांबळ उडाली.
दिवाळी सण आटोपल्यानंतर खात्यावर जमा झालेली पिक विम्याची रक्कम काढण्यासाठी विविध भागातील शेतकऱ्यांनी आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे बँकेचे इतर व्यवहार देखील ठप्प झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत रक्कम मिळण्यासाठी शेतकरी बँकेत बसून असल्याचे चित्र पहावयास मिळाले.












