हिंगोली- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात भाजपच्या वतीने तानाजी मुटकुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह या विधानसभेकरिता रामदास पाटील यांच्यासह अन्य काही जणांची नावे चर्चेत आली होती. या पार्श्वभूमीवर पक्ष काय निर्णय घेणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज दुपारी साडेतीन वाजता भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेतील उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली विधानसभेचे उमेदवार तानाजी मुटकुळेच राहतील असे स्पष्ट झाले आहे. मुटकुळे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी रामदास पाटील सुमठाणकर हे काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.












