हिंगोली – विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.रुपालीताई राजेश पाटील गोरेगावकर यांनी ६ नोव्हेंबर बुधवारी डिग्रस कऱ्हाळे येथे महारुद्र हनुमान मंदीरात पुजन करुन प्रचाराचे नारळ फोडून शुभारंभ केले यावेळी काढण्यात आलेल्या रॕलीत नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या विधानसभा मतदारसंघातआजही अनेक विकास कामे प्रलंबीत आहे जसे की सिंचन,शिक्षण,नविन उद्योग आण्णयात देखील सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेले आहेत.आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने विजयाचे शंकनाद फुकला आहे याच विश्वासाने विजयी झाल्यानंतर मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई,राष्ट्रवादी काँग्रेस श.प जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण,शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेशराव देशमुख,कृउबा सभापती राजेश पाटील गोरेगावकर,उद्धवराव गायकवाड,गंगाराम कराळे,परमेश्वर मांडगे,अनिल पतंगे,सुरेश अप्पा सराफ,शेख नेहाल भैय्या,गजानन देशमुख,विलास गोरे,अनिल नेनवाणी,गणेश शिंदे,मुजीब पठाणशिवाजी कराळे,भारत श्रिरामे आदीची उपस्थिती होती.












