हिंगोली :-विधानसभा निवडणूक निमित्ताने महायुतीचे उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ स्टार प्रचारक आमदार पंकजा मुंडे यांची आज आठ ऑक्टोबर शुक्रवारी सेनगावात जाहीर सभा होणार आहे.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांच्या निवडणूक प्रचार निमित्ताने स्टार प्रचारक मधील आमदार पंकजा मुंडे यांची सेनगावातील आठवडी बाजार मैदानावर आज 8 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता जाहीर सभा होणार आहे. यावेळी महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत.भाजपाच्या नेते मंडळीपैकी पहिली जाहीर सभा होत असल्याने महायुतीचा उत्साह अधिक वाढला आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेनिमित्त महायुतीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.












