हिंगोली- विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार रूपालीताई पाटील गोरेगावकर यांना भारताचा कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याच्या जिल्हा सचिव असलेले सुरेश काचगुंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज रूपालीताई पाटील गोरेगावकर यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन राजेश पाटील गोरेगावकर यांना अधिकृत पाठिंब्याचे पत्र सोपविले. महायुती शासन हे फॅसिस्ट विचारसरणीने वागत असल्यामुळे कम्युनिस्ट पार्टी अधिकृतपणे रूपालीताई पाटील गोरेगावकर यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी जिल्हा सचिव सुरेश काचगुंडे, चंपतराव विठ्ठलराव नाईक, नाथराव शिंदे, रुस्तुम राठोड, रंगराव पवार, प्रफुल्ल शिंदे, सुरेश आढळकर यांची उपस्थिती होती.












