हिंगोली – येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत सक्रिय असलेल्या एका (भा) घटिया कंत्राटदारावर अधिकाऱ्याची चांगलीच मर्जी झाली असून कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता करून भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
हिंगोली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग अंतर्गत एका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा संदर्भात न्यूज माध्यमने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विभागामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. यातूनच सदरील अधिकाऱ्यांचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. बांधकाम उपविभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून याच कामांमध्ये कार्यरत असलेल्या एका घटिया कंत्राटदराने अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता अनियमितता करून संबंधित अधिकाऱ्याची मर्जी संपादन करीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचे देखील समोर येत आहे. शिवाय संबंधित अधिकारी काही कंत्राटदारांच्या नावावर स्वतःच काम करत असल्याचे देखील बोलले जात आहे. विभागातील नांदेड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूत जुळवून संबंधित अधिकारी आपल्या मनमानीप्रमाणे काम करीत असून या प्रकाराला स्थानिकचे अनेक कर्मचारी वैतागल्याचे देखील दिसून येत आहे. परंतु वरिष्ठांशी असलेल्या संबंधामुळे कुठलाही कर्मचारी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलण्यास तयार नाही. शिवाय एका स्थानिक लोकप्रतिनिधीशी देखील संबंधित अधिकाऱ्याने हात मिळवणी केल्याचे ऐकावयास मिळत आहे. परंतु यासंदर्भात काही राजकीय नेते कामाला लागले असून विभागांतर्गत मोठे घबाड लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












