अत्याधुनिक सुधारित मुळव्याध चिकित्सेकरिता आंतरराष्ट्रीय पेटंट भारतीय डॉक्टरांच्या संघांमध्ये हिंगोली येथील डॉक्टर गजानन धाडवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या नवीन चिकित्सा प्रणालीमुळे उपचार पद्धतीत मोठा अमुलाग्र बदल घडून त्याचा रुग्णांना फायदा होणार आहे.
डॉ.आलोक मोहनलाल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली भारतातील डॉक्टरांच्या चमू ने मुळव्याध या आजाराच्या उच्चटनाकरिता एक सुधारित उपचार पद्धती शोधली. याकरिता जर्मन पेटेड अँड ट्रेडमार्क ऑफिस कडून” हिमोरायडल रिपेअर सिस्टीम विथ अ मल्टीस्टेज प्रोटोस्कोप गायड सर्जिकल मेकॅनिझम” युटिलिटी पेटंट साठी” पेटंट सर्टिफिकेट” मिळाले.
या टीमचे नेतृत्व यवतमाळ निमा प्रोकटोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष येथील डॉ आलोक गुप्ता तर सहाय्यक म्हणून हिंगोली येथील निमा प्रोकटोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ गजानन धाडवे जबाबदारी पार पाडली.
पेटंटचे शोधक आणि मालक भारतातील विविध शहरांमधील डॉक्टरांचा एक गट आहेत. यामध्येडॉ. आलोक मोहनलाल गुप्ता, यवतमाळ, महाराष्ट्र, डॉ. अमोल अशोक गुप्ता, यवतमाळ, महाराष्ट्र, डॉ. मुकेश कुमार गुर्जर, टोंक, राजस्थान,डॉ. ऋषिकेश रामेश्वर तोडकर, बिड, महाराष्ट्र, डॉ. कल्पराज अनिल कोठारी, जळगाव, महाराष्ट्र, डॉ. प्रेरणा प्रवीण यादव, मुंबई, महाराष्ट्र, डॉ. शुभांगी अमोल मेटांगळे, बुलढाणा, महाराष्ट्र, डॉ. दीक्षांत शेरसिंग वर्मा, भिवानी, हरियाणा, डॉ. गजानन रामचंद्र धाडवे, हिंगोली, महाराष्ट्र यांचा समावेश आहे.
जर्मन पेटंट आणि ट्रेडमार कार्यालयाचे अध्यक्ष इवा स्वेवियर यांनी आपल्या स्वाक्षरीने हे दस्तावेज पारित केले. दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या या उपचार पद्धती डॉक्टर गजानन धाडवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्यामुळे जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.












