Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

दोन्ही आमदारांत खडाजंगी !

आरोप प्रत्यारोप झाले सुरू

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 26, 2025
in राजकारण, हिंगोली
0
दोन्ही आमदारांत खडाजंगी !
0
SHARES
292
VIEWS

हिंगोली- आमदार तानाजी मुटकुळे यांनी माझ्या घरी शंभर पोलीस पाठवले असा आरोप संतोष बांगर यांनी केल्यानंतर मुटकुळे यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले. नगरपालिकेच्या रणधुमाळी मध्ये दोन्ही आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी होत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली नगरपरिषद निवडणुक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपेक्षा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर व हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ या दोनच नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काल कॉर्नर सभेच्या वेळी बोलताना संतोष बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांच्यावर आरोप करताना सांगितले की मुटकुळे यांनी माझ्या घराची तपासणी करण्याकरिता 100 पोलीस पाठवले. पोलिसांमुळे माझ्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला. घरातील फ्रिजची सुद्धा पोलिसांनी तपासणी केली. माझ्यासारख्या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे यापुढे काय होणार याचा विचार करा आणि महिला भगिनींनी तुमच्या भावाला झालेल्या त्रासाचा बदला घेऊन निवडणुकीत विरोधकांना जागा दाखवा असे आवाहन संतोष बांगर यांनी केले होते.
यावर आज आमदार तानाजी मुटकुळे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या रेकॉर्डवर ज्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींच्या घरांची तपासणी करण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता अवैद्य शस्त्रे व इतर काही गोष्टी तपासणी करिता पोलिसांची ही मोहीम सुरू आहे. संतोष बांगर यांच्यावर यापूर्वी अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने पोलीस त्यांच्या घरी तपासणीसाठी गेली होती. यात माझा काहीही संबंध नाही. पोलीस विभागात त्यांच्या नावावर असलेली रेकॉर्ड ही त्यांच्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे देखील मुटकुळे यांनी सांगितले.

Tags: #bjp_hingoli#Hingoli_nagar_parishad#santosh_bangar#shivasena#tanaji_mutkule
Previous Post

भाजपच्या आणखी दोन उमेदवारांची माघार !

Next Post

आम्हाला माल कमवायचा नाही;विकास करायचा आहे- मुख्यमंत्री फडणवीस

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
आम्हाला माल कमवायचा नाही;विकास करायचा आहे- मुख्यमंत्री फडणवीस

आम्हाला माल कमवायचा नाही;विकास करायचा आहे- मुख्यमंत्री फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!