Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आम्हाला माल कमवायचा नाही;विकास करायचा आहे- मुख्यमंत्री फडणवीस

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 27, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
आम्हाला माल कमवायचा नाही;विकास करायचा आहे- मुख्यमंत्री फडणवीस
0
SHARES
538
VIEWS

हिंगोली- भारतीय जनता पार्टी ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणारी पार्टी आहे. आम्हाला माल कमवायचा नाही तर जनतेचा विकास करायचा आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली येथील प्रचार सभेत केले.


नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर हिंगोली कळमनुरी व वसमत येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचाराकरिता भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज गांधी चौक येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये हिंगोलीचा अमुलाग्र विकास करण्यात आम्हाला यश आले. विकास कामे दर्जेदार व्हावी केवळ याच उद्देशाने आम्ही काम करत असतो. विस्तारित नळ योजना असेल, भूमिगत गटार योजना असेल किंवा शहरासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलेश्वर तलाव सुशोभीकरण असेल, तसेच शहरातील अंतर्गत रस्ते असतील अशा अनेक प्रकल्पांना आम्ही कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. वाढती लोकसंख्या आणि मूलभूत गरजा लक्षात घेता येणाऱ्या काळात देखील रोजगार निर्मिती, उद्योग निर्मिती तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण असेल यासाठी आम्ही बांधील आहोत. जनतेने आपल्या मताची किंमत ओळखून मतदान करणे गरजेचे आहे. आपण ज्यांना मतदान देत आहोत ते पाच वर्षाकरिता आपल्या शहराचे कारभारी आहेत याचे भान ठेवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा. बाकी शहराच्या विकासासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे आणि मला खात्री आहे भविष्यातील विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून जनता 2 डिसेंबर रोजी कमळ चिन्हावर मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी निवडून देईल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या सभेला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, राज्यमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, हिंगोली नगराध्यक्षपदाचे उमेदवार नीताताई बाबाराव बांगर, कळमनुरीच्या उमेदवार वैशाली संजय कावडे, सुषमा शिवदास गोटेवार यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार यांची उपस्थिती होती. सभेला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Tags: #babarav_bangar#bjp_hingoli#Devendra_Fadanvis#Hingoli_nagar_parishad#tanaji_mutkule
Previous Post

दोन्ही आमदारांत खडाजंगी !

Next Post

महाविकास आघाडीचे रॅलीतून महाशक्ती प्रदर्शन

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
महाविकास आघाडीचे रॅलीतून महाशक्ती प्रदर्शन

महाविकास आघाडीचे रॅलीतून महाशक्ती प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!