हिंगोली- तालुक्यातील बासंबा येथे शेतातील पाण्याची मोटर ठरलेल्या वेळी का चालू केली नाहीस या कारणावरून एका 40 वर्षीय इसमाचा गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बासंबा शिवारात घडली.
फिर्यादी राजू गणपत घुगे यांनी बासंबा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नानाराव घुगे याने बासंंबा शिवारातील शेतामध्ये ठरलेल्या वेळी शेतातील पाण्याची मोटर का सुरू केली नाहीस या कारणावरून गजानन गणपत घुगे वय 40 वर्ष याचा छातीवर बसून गळा दाबून खून केला. तसेच राजू घुगे यास देखील मारहाण केली. गजानन घुगे यांच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी ज्ञानेश्वर घुगे यांच्याविरुद्ध बासंबा पोलिसांत आज गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बासबा पोलीस करीत आहेत.












