वसमत ह जालना – छपरा रेल्वे पूर्णा -हिंगोली -अकोला मार्गे चालवावी आणि हिंगोली हुन मुंबई करिता रेल्वे सुरू करावी ह्या व वसमत सह जिल्हाभरातील रेल्वे संदर्भातील मागण्या साठी २३ नोव्हेंबर रोजी रेल्वे संघर्ष समिती तर्पेâ रेल रोको व जिल्हा बंदचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात वसमत चाही शंभर टक्के सहभाग राहणार असल्याचा निर्णय शनिवारी वसमत येथे झालेल्या रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
वसमत येथील सरस्वती मंदिर येथे शनिवारी रेल्वे संघर्ष समिती व्यापारी महासंघ पत्रकार व नागरिकांची संयुक्त बैठक झाली २३ नोव्हेंबर रोजी च्या आंदोलनाची आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी व तालुकास्तरावर जनजागृती बैठक पार पडली. या बैठकीत वसमत येथील रेल्वे स्थानकावरील विविध समस्या ही मांडण्यात आल्या यात वसमत रेल्वे स्थानकावर कोच इंडिकेटर बसवणे, नंबर दोन प्लॅटफॉर्म तयार करणे व जलद गाड्या वसमत येथे थांबाव्यात, रॅक पॉईंट बंद करावा, राईट पॉईंट वर येणार्या जड वाहनामुळे रस्ते खराब होतात त्यामुळे जड वाहने पर्यायी मार्गाने न्यायवित किंवा हा प्रकार बंद करावा, शहरातून जाणारी जड वाहने बंद करावी या व अनेक गंभीर मागण्यांवर सांगोपांग चर्चा झाली. या बैठकीसाठी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुगे हिंगोली जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बसंतकुमार भट्ट, व्यापारी महासंघाचे राज्य प्रतिनिधी रवींद्र कुमार सोनी, विराट लोक मंचचे अध्यक्ष शेख नईम शेख लाल आदी मान्यवरांची उपस्थिती २३ नोव्हेंबर रोजीच्या आंदोलना संदर्भातील नियोजन या मान्यवरांनी वसमत येथील बैठकीसमोर मांडले व या आंदोलनात वसमतकरांनीही सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले त्यास वसमतच्या सर्व व्यापारी बांधवांनी पत्रकार रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी पाठिंबा दर्शवून या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले. या बैठकीसाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, नवीन कुमार चौकडा, दीपक कुलथे, जगदीश मोरे, अशोक सावजी, पवार बाबुराव रोकडे, महादेव कापूसकरी, बालासाहेब महागावकर, भाऊ भागानगरे, राजेंद्र काबरा, वसंत चेपुरवर, लक्ष्मीनारायण मुरक्या, सतीश पाटील महागावकर, अॅड चंद्रकांत देवणे, तानाजी कदम, राजेश भोसले, गणेश काळे, महेश दलाल, सागर दलाल, सचिन बोबडे, संजय पवार, भारत स्वामी, सुरज बांगड्या विनोद कडतन, संदीप बाहेती, जयंतीलाल पटेल, नारायण उदावंत, सत्यनारायण दूधवाल , विठ्ठल मुंडे, प्रकाश शहाणे, साईनाथ पतंगे, आशिष दलाल, प्रशांत कारले, मनोज लड्डा ,नंदू परदेशी, नागेश चव्हाण, मारुती धोंडे, देवा चपटे यांच्यासह शहरातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक कुलथे, नवीन कुमार चौकडा यांनी केले.












