Monday, October 12, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी !

सेनगावात शिवसैनिकांकडून पुतळा जाळण्याचा प्रयत्न

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 20, 2022
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण
0
राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी !
0
SHARES
96
VIEWS
 हिंगोली- छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करून अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तीव्र घोषणाबाजी करीत कोश्यारी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. नंतर सेनगाव पोलिसांनी शिवसैनिकांना अटक करून नोटीस बजावत सोडून दिले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भाजप नेत्यांशी केली. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून त्यांची बरोबरी जगात कोणीही करू शकत नाही. अशी भावना व्यक्त करीत जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सेनगाव येथे आज रविवारी दुपारी कोश्यारी यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी कोश्यारी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करीत पुतळा ताब्यात घेतला. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी राज्यपालांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
 या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह तालुकाप्रमुख संतोष देवकर, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, बद्रि कोटकर, विठ्ठलराव शिंदे, जगदीश गाडवे, संतोष गाडवे, वैभव देशमुख, निखिल देशमुख, करण देशमुख, स्वप्निल देशमुख, राहुल वाकळे, अवेज पठाण, चेतन देशमुख, जीवन देशमुख, सुनील शिंदे, दिगंबर देशमुख आदी शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला. सेनगाव पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर नोटीसीवर सोडून दिले. यावेळी उपनिरीक्षक मोकळे, लोकरे, जामदार चव्हाण आदींनी बंदोबस्त राखला.
Tags: Bhagatsingh KoshyariShivsena
Previous Post

२३ नोव्हेंबरच्या जिल्हा बंद आंदोलनात वसमतचाही सहभाग

Next Post

लोंढेच्या गावाला लोंढेची भेट !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
लोंढेच्या गावाला लोंढेची भेट !

लोंढेच्या गावाला लोंढेची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!