हिंगोली- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरातील गांधी चौकात कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भाजप नेत्यांशी केली. हा प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असून महाराष्ट्रातील जनता तो कदापि सहन करणार नाही. अशी भावना जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख भानुदास जाधव, हिंगोली विधानसभा संघटक उद्धव गायकवाड, जिल्हा संघटक हिंगोली विधानसभा बाळासाहेब मगर, नंदू खिलारे, प्रा. मोरे सर, राजभाऊ पाटील, आसिफ पठाण, पंढरीनाथ ढाले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, अविनाश भाऊ चव्हाण, शेख अतिक, आसिफ पठाण, करण मुदीराज, रवी काळे, सचिन काळे, करण शिंदे, मंगेश डोलारे, सुधीर गरड, बालाजी पाटील, शिवाजीराव सरकटे, गणेश राजुलवार यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि भाजपच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.












