हिंगोली- राज्य व केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती व्हावी याकरिता हिंगोली नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता विषयावर आधारित पथनाट्य स्पर्धेचे आयोजन आज सोमवारी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध पथकांनी आपली कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
माझी वसुंधरा 3.0 अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण 2023, शहर सौंदर्यीकरण स्वच्छता स्पर्धा 2022, वार्ड सौंदर्यीकरण स्पर्धा 2022,आझादी का अमृत मोहोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत मोहोत्सव, स्वच्छता के दो रंग, जलशक्ती अभियान अंतर्गत स्वच्छ पथनाट्य स्पर्धेचे आयोजन.
सदर अभियाना अंतर्गत आज दि.21 नोव्हेंबर रोजी नगर परिषदेच्या वतीने पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करणात आले.नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या निर्णयानुसार पर्यावरण व वातावरणीय बदल लक्षात घेऊन, संपूर्ण राज्यात पृथ्वी, वायू, जल, अग्री व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे.हिंगोली शहरात सुध्दा विविध उपक्रमांद्वारे हे अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली नगर परीषदकडून राबविल्या जात असलेल्या स्पर्धेला कलाकारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातून सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थी व युवा यांनी सहभाग घेतला आणि अतिसुंदर व उत्कृष्ठ असे पथनाट्य सादर केले. तसेच आपल्या पथनाट्यच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन व संगोपन करने, सिंगल युज प्लास्टिक बंदी, पाण्याचे जपून वापर करणे, सांडपाणी व्यवस्थापन, सौर उर्जेचा, अक्षय उर्जेचा वापर करणे, विद्युत वाहनांचा वापर करणे करिता संदेश दिले. सदर पथनाट्य स्पर्धेत स्वच्छता व पर्यावरण दूत रत्नाकर महाजन आणि ज्ञानबा मुसळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कचरा वर्गीकरण, ओला व सुख कचरा वर्गीकरण, घरघुती व सार्वजिनक शौचालयाचे वापर, होम कंपोस्टिंग बाबत माहिती दिली. त्याच बरोबर अक्षय उर्जा सौर उर्जेचा योग्य वापर, झाडांचे संगोपन व संवर्धन, इलेक्ट्रिक वाहनाचा वापर तसेच पाण्याचे योग्य वापर करिता जागरूकता केली.तसेच पथनाट्य निरीक्षकांनी स्पर्धाकंना त्यांच्या अभिनय सादरीकरण,संदेश, टीम वर्क, सादरीकरणाच्या आवाजाची तीव्रता या आधारावर योग्य गुण दिले आणि त्यांच्या पथनाट्य सादरीकरण बाबत त्यांचे कौतुक केले.
यावेळी उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, कार्यालयीन अधीक्षक देविसिंघ ठाकूर, स्वच्छता अभियंता श्रीमती सनोबर तसनीम, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अभियंता रविराज दरक, वसंत पुतळे, विजय इटकापल्ले, गजानन हिरेमठ, राजेश पदमने, किशोर काकडे,श्रीमती प्रिया मोटे, लेखापाल अनिकेत नाईक, वरिष्ठ लिपिक संजय दोडल, संदीप घुगे, डी.पि.शिंदे, अशोक गवळी,श्री.विनय साहू, श्री.राजू असोले,श्री.पंडित मस्के, विजय रामेश्वरे, शहर समन्वयक आशिष रणसिंगे, स्वच्छता निरीक्षक सहायक दिनेश वर्मा, माधव सुकते,अथर्व वर्मा, कुणाल कांबळे, चेतन भूजवने, आकाश गायकवाड, रवी गायकवाड,ललिता खंदारे,चित्र वर्मा अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.












