Tuesday, October 13, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home क्राईम

बचावासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार !

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून दगडफेक

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
December 10, 2022
in क्राईम, हिंगोली
0
बचावासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार !
0
SHARES
465
VIEWS
हिंगोली- गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या पथकाने संशयित पिकअप गाडीला अडविण्याचा प्रयत्न केला असता गाडीतील आरोपींनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यावेळी बचावासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची घटना वसमत शहरातील पोलीस वसाहत नजीक आज 10 डिसेंबर रोजी पहाटे पहाटे 5 च्या सुमारास घडली.
 वसमत शहर पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्रीपासून गस्तीवर होते. हे पथकात शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पोलीस वसाहत नजीक असताना संशयित पिकअप जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी पिकअप थांबविण्याचा प्रयत्न केला. पिकअप चालकाने गती कमी केली आणि अचानक पिकप मधून पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी शिवाजी पतंगे यांच्या डोक्याला दगड लागून गंभीर दुखापत झाली.
 यावेळी गस्ती पथकामधील पोलीस अधिकारी बाबासाहेब खार्डे यांनी आपल्या रीवाल्वर मधून हवेत गोळीबार केला. गोळीबार ऐकताच आरोपींनी घटनास्थळावरून पिकअप सह धूम ठोकली.
 पोलिसांनी पिकअपचा पाठलाग सुरू केला. सदर पिकअप आसेगाव मार्गे नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव परिसरात भरधाव वेगात पलटला. पिकअप पलटताच गाडीतील आरोपी फरार झाले. घटनास्थळी पोलीस पोहचले असता सदर पिकअप मध्ये अवैधरित्या पाच गाई कोंबून नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यातील काही गाय पिकअप उलटल्यामुळे जखमी देखील झाल्या आहेत. पोलिसांनी जखमी गाईंना गोशाळेमध्ये रवाना केले. दरम्यान पिकप मध्ये काचेच्या गोट्या, गुलेर, दगड भरून ठेवलेली पोते असे साहित्य आढळून आले.
 जनावरांच्या तस्करीचा संशय
 उलटलेल्या पीकअपच्या समोरील बाजूस वेगळा नंबर व मागील बाजूस वेगळ्या नंबरची प्लेट आढळून आली आहे. त्याचबरोबर पिकअपच्या आत मध्ये देखील अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून हा प्रकार अवैधरित्या जनावरांची वाहतूक, तस्करी अथवा चोरी करण्याचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान फरार आरोपींचा तपास वसमत पोलिसांच्या वतीने सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी भेट देऊन पाहणी केली.
Tags: Hingoli Police
Previous Post

विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवून स्वतःची ओळख निर्माण करावी.

Next Post

कबड्डी मागचा खेळ…

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
कबड्डी मागचा खेळ…

कबड्डी मागचा खेळ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

Recent News

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!