हिंगोली- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांनी काल रविवारी आपल्या काही समर्थक आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये शरद पवार व अजित पवार अशा दोन गटांची चर्चा सुरू झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची काय भूमिका असणार? याबद्दल देखील मोठी चर्चा होऊ लागली होती. त्यातच काही नेते आपला मोबाईल बंद करून गायब झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज सोमवारी हिंगोली येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पक्षनेते तथा हिंगोली जिल्हा प्रभारी जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाची बैठक बोलाविण्यात आली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे, जगजीत राज खुराणा, अनिल पतंगे, संजय दराडे, नेहाल भैय्या यांच्यासह पक्षातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी यांची उपस्थिती होते. यावेळी पक्ष नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. उपस्थित असलेल्या बहुतांश पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपण पक्षनेते शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. याच मुद्द्यावर वसमतचे आमदार नवघरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली व त्याला जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी देखील दुजोरा rochie plaja tricotata cu gauri bej hq8716 Italy casio model calculator xbox 360 freezing boss autoradio grzebień do otwierania zamków اساور مونت بلانك الاصليه grzebień do otwierania zamków amazon die beste wasserpistole der welt eiszapfen lichterkette 3m batterie flachpol adapter ισοθερμικο μπλουζακι stok миглопластика косъм по косъм vanhunks kayak yeezy shoes for sale त शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केला. जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हिंगोली जिल्हा म्हणून शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा ठराव घेऊन बैठक संपविली.
आजच्या या बैठकीमध्ये अनेक नेते व कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच्या सुरात सूर मिसळत शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याची भाषा केली असली तरी येणाऱ्या काळात यातील काही मंडळी अजित पवार यांच्या गोटात सामील होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.












