हिंगोली- राज्यात असलेले ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे केवळ वाफा सोडणारे सरकार आहे. सरकार आपल्या दारी आणि थापा मारते लय भारी अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील निर्धार सभेमध्ये राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा देखील समाचार घेतला.
हिंगोली येथील निर्धार सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आज पहिली सभा घेतली. या सभेत त्यांनी राज्य सरकार व भाजप यांना केंद्रस्थानी ठेवून टीका केली. यामध्ये राज्यातील शेतकरी संकटात असताना उपमुख्यमंत्री जपानचे दौरे करतात तेथील पुरस्कार स्वीकारतात हा प्रकार कितपत योग्य वाटतो. केवळ मोदींच्या सांगण्यावरून राज्यातील अनेक उद्योग गुजरातला बहाल केले. त्यानंतर नवीन उद्योग महाराष्ट्रात आणण्याच्या मोठ्या वल्गना केल्या परंतु प्रत्यक्षात यातले काहीच घडले नाही. विकासाच्या प्रत्येक विषयामध्ये केवळ थापा मारण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागते यापेक्षा दुर्दैव काय? असा मुद्दा त्यांनी मराठवाड्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या अनुषंगाने भाषणात उपस्थित केला.

आमचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम असे आहे. ज्यांनी आमची इंडियन मुजाहिद्दीन सोबत तुलना केली त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. या देशाची लोकशाही टिकावी याकरिता आम्ही इंडिया म्हणून एकत्रित आलो आहोत. ज्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत पाकिस्तान सामना खेळविला जाणार आहे त्याबद्दल यांना काय वाटते ? सुषमा स्वराज यांनी जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान सोबत कुठलेच संबंध ठेवणार नाही असा इशारा दिला होता तो विचार तुम्ही विसरून गेलात काय ? ज्या संघ परिवाराचा आपण उदो उदो करता त्याच संघ परिवारातील कुरुलकर नावाच्या देशद्रोह्याबद्दल आपण का बोलत नाहीत ? का त्याला सुद्धा नंतर देशप्रेमी म्हणून सिद्ध करणार.
मला भाजपच्या कार्यकर्त्यांची अतिशय दया येते ज्यांनी प्रामाणिकपणे पक्षाच्या सतरंज्या उचलण्याचे काम केले त्यांच्या नशिबी आजही तेच काम आहे. उपरे नेत्यांचे नेतृत्व त्यांना सहन करावे लागत आहे. भाजप हा आयारामांचा पक्ष झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घरापर्यंत पोहोचविण्याचे अभियान भाजपने सुरू केले आहे. त्या अनुषंगाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सदर योजनांची पडताळणी आपल्या घरापासून करावी. जेणेकरून सत्यता समोर येईल. मागील रक्षाबंधनाला मोदींनी ज्यांच्याकडून राखी बांधली ते त्यांच्या दृष्टीने निष्कलंक झाले. याचा अर्थ मोदींना राखी बांधा आणि ईडीची कारवाई थांबवा असाच समजायचा का ? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी खासदार भावना गवळी यांना टोला लगावला. त्या पाठोपाठ मोदींनी या रक्षाबंधनाला मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करा असे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे. माझा त्यांना प्रश्न आहे की ज्या बिलकिश बानोवर अनन्वित अत्याचार झाले. तिच्याकडून तुम्ही राखी बांधून घेणार का?
ईडि सारखी शासकीय यंत्रणा वापरून आपले राजकीय ध्येय साध्य करण्याचे काम तुम्ही करीत आहात. ज्या हसन मुश्रीफ यांचा ईडीने अनेक छापे मारून छळ केला आज ते सोबत येताच ईडी त्यांचा पत्ता विसरून गेली.
निवडणुका येताना सबका साथ सबका विकास आणि निवडणूक संपल्यावर सर्वांना लाथ आणि दोस्तशाहीला साथ देत देशातील मोठे प्रकल्प जवळच्यांच्या खिशात घालण्याचे काम भाजप करीत आहे. माझ्यावर घराणे शाहीचा आरोप करीत आहात परंतु मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे आणि जनतेने मला स्वीकारले आहे. परंतु तुम्हाला राजकीय स्वार्थासाठी माझा बाप चोरण्याची वेळ आली यापेक्षा दुर्दैव काय असणार? येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी मोदींकडून 2030 पर्यंत जनतेला चंद्रावर घर देण्याचे देखील आश्वासन दिले जाऊ शकते किंवा सत्यपाल मलिक यांनी सांगितल्याप्रमाणे राम मंदिर उद्घाटनानंतर देशात दंगली पेटविल्या जाऊ शकतात असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला.
आपल्या भाषणात त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समितीचा देखील समाचार घेतला. तुम्हाला नेमके काय करायचे ते स्पष्ट करा. भाजप विरोधातील मतदानात फूट पडायची यासाठी येत असाल तर विचार करा किंवा त्यापेक्षा स्पष्टपणे भाजपसोबत जा असा इशाराही त्यांनी दिला. या सभेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनायक राऊत , संपर्कप्रमुख बबन थोरात, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.casio model calculator manico basso 5 corde amazon blow up two person kayak boss autoradio claudie pierlot outlet horny toad clothing t shirt gr 98 bauchtasche eastpak batterie flachpol adapter hypervenom nike acc chia seeds benefits for women κρεβατια μονα με αποθηκευτικο χωρο και στρωμα eiszapfen lichterkette 3m ua old skool best jordans
*चौकट*
आपल्या भाषणात त्यांनी कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना देखील टोले लगावले. नाग समजून ज्यांची पूजा केली तेच डसायला निघाले. मटका आणि जुगाराचे धंदे करणारा कधीच हिंदू असू शकत नाही. सर्वसामान्य नागरिक आणि जनतेसोबत उद्धटपणे वागणाऱ्याला जनताच गाडून टाकेल अशी अशी टीका देखील त्यांनी केली.












