Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

चर्चा दोन संपर्क प्रमुखांची !

दोन उमेदवारांचे दोन कारभारी

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
April 18, 2024
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
चर्चा दोन संपर्क प्रमुखांची !
0
SHARES
1.2k
VIEWS

हिंगोली- लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असला तरी या प्रचारामध्ये दोन्ही बाजूच्या संपर्कप्रमुखांच्या बाबतीत देखील तेवढीच चर्चा रंगू लागली आहे.
शिवसेना पक्ष फुटण्यापूर्वी या जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून बबन थोरात यांनी कारभार सांभाळलेला होता. त्यामुळे थोरात यांना हिंगोली लोकसभेच्या बाबतीतला पूर्व इतिहास माहित आहे. थोरात यांच्यानंतर आनंदराव जाधव हे हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख झाले. पक्ष फुटी नंतर जाधव यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आणि पुन्हा हिंगोली संपर्कप्रमुख झाले तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बबन थोरात यांच्यावर विश्वास टाकत हिंगोलीची धुरा त्यांच्या हाती सोपवली. महायुतीचे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचाराची मुख्य धुरा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या हातात आहे. संपर्कप्रमुख पद मिळाल्यानंतर जाधवांनी हिंगोली जिल्ह्यातील पक्ष संघटन वाढवण्यावर फारसा भर दिला नाही. ज्याचे परिणाम आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडे स्वतःची अशी तुल्यबळ यंत्रणा नाही जे काही चालू आहे ते भाजप भरोसे म्हणावे लागेल. भाजपचे नेते मंडळी केवळ वरिष्ठांचा आदेश म्हणून कदम यांच्या प्रचारात आहे परंतु संपर्कप्रमुख म्हणून या भाजप नेत्यांना आपलेसे करण्यात जाधवांना यश आलेले नाही. पक्ष संघटनेतील संपर्कप्रमुख असे महत्त्वाचे पद असतानाही जाधवांना त्याची व्याप्ती समजली नाही. ज्याचे परिणाम या निवडणुकीत उमेदवार कदम यांना भोगावे लागू शकतात.
दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी आधीपासूनच नागेश पाटील आष्टीकर यांना मतदारसंघात फिरविले होते. प्रमुख इच्छुक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा घडवून आणली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अष्टीकर यांची उमेदवारी जाहीर केली. थोरात यांनी पूर्वीपासूनच गावपातळीपर्यंत कार्यकर्त्यांची फळी तयार ठेवली असल्यामुळे आजच्या प्रचार यंत्रणेमध्ये त्याचा त्यांना मोठा लाभ होत आहे. एवढेच नव्हे तर मित्र पक्षातील नेत्यांच्या नाराजी दूर करून त्यांना प्रत्यक्ष प्रचारात उतरविण्याची कलादेखील थोरात यांनी साध्य केली.
शिवाय महायुतीमध्ये भाजपच्या नाराजीचा फायदा उठवण्याच्या दृष्टिकोनातून थोरात यांनी अनेक राजकीय डाव खेळल्याचे देखील बोलल्या जात आहे.
दोन्ही बाजूचे दोन संपर्कप्रमुख दोन्ही उमेदवारांचे कारभारी आहेत. परंतु थोरात यांची खेळी मात्र जाधव यांना मात देणारी ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Tags: #anand_jadhav#baban_thorat#उध्दव_ठाकरे#शिवसेना#हिंगोली_लोकसभाShivsena
Previous Post

रामाच्या नावाखाली सामंतांचा राम राम !

Next Post

पंधरा टक्केवाले पालकमंत्री आहेत कुठे ?

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
पंधरा टक्केवाले पालकमंत्री आहेत कुठे ?

पंधरा टक्केवाले पालकमंत्री आहेत कुठे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!