Monday, October 12, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home हिंगोली

सुरक्षा आणि सुविधांना प्राधान्य- पोलीस अधीक्षक कोकाटे

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
September 6, 2024
in हिंगोली
0
सुरक्षा आणि सुविधांना प्राधान्य- पोलीस अधीक्षक कोकाटे
0
SHARES
123
VIEWS

हिंगोली जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेषतः शाळेतील विद्यार्थिनींना सुरक्षा देण्याच्या उद्देशाने पोलीस दीदी व पोलीस काका उपक्रम प्राधान्याने राबविणार असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये वसाहतीच्या सुविधा कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांची संवाद साधला. हिंगोली जिल्ह्यात ज्या पोलीस स्थानकांमध्ये संवेदनशील ठिकाण आहे अशा ठिकाणी विशेष लक्ष देऊन गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर अधिक भर देण्यात येणार आहे. पोलीस स्थानकांच्या ठिकाणी जुन्या इमारती तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता निवासाच्या सुविधा पुरेशा नाहीत या बाबी लक्षात घेऊन नवीन पोलीस ठाण्यात इमारती व निवास व्यवस्था निर्माण करण्याकडे लक्ष दिल्या जाईल.
जिल्ह्यातील विद्यार्थिनींना संरक्षण देण्याच्या उद्देशाने पोलीस दीदी व पोलीस काका उपक्रम नव्याने हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार शाळांमध्ये जाऊन पोलीस कर्मचारी त्यांना विश्वासात घेऊन संपर्क साधतील. तसेच सदरील कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक देखील शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हिंगोली शहरातील वाहतुकीच्या संदर्भात हिंगोली नगरपालिकेसोबत चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याबाबत देखील उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सुधीर वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, उपनिरीक्षक शिवशंभ घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मलपिल्लू यांची उपस्थिती होती.

Tags: #shrikrushna_kokate
Previous Post

सोमवारी सिंचन संघर्ष समितीचा ट्रॅक्टर मोर्चा

Next Post

महायुतीत मिठाचा खडा ?

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
महायुतीत मिठाचा खडा ?

महायुतीत मिठाचा खडा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

Recent News

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!