Thursday, October 8, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home Uncategorized

प्रचार सभेत टारफे यांची तुफान फटकेबाजी

बांगर यांच्यावर बरसले

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
October 29, 2024
in Uncategorized, महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
प्रचार सभेत टारफे यांची तुफान फटकेबाजी
0
SHARES
428
VIEWS

हिंगोली- कळमनुरी विधानसभा निवडणुकीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार संतोष टारफे यांनी आपला अर्ज दाखल करताना घेतलेल्या प्रचार सभेत जोरदार फटकेबाजी करत संतोष बांगर यांच्यावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांच्या प्रचार सभेला हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.


हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संतोष टारफे विरुद्ध संतोष बांगर यांच्यात हा सामना रंगणार आहे. आज संतोष टारफे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या प्रचार सभेमध्ये त्यांनी प्रथमच अशी तुफान फटकेबाजी केली.

मागच्या निवडणुकीत ज्या संतोष बांगर यांच्याकडे काही लाखाची प्रॉपर्टी होती आज त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता कुठून आली? लोणावळ्या सारख्या ठिकाणी फार्म हाऊस कुठून आले? तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो तर पहिली इडी संतोष बांगर यांना लावणार. लोकांना मूर्ख बनविण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांच्या मिरवणुका काढल्या. आज या महापुरुषांचे पुतळे कुठे आहेत? स्वतःच्या बंगल्यावर पुतळे बांधून ठेवून बांगर यांनी या महापुरुषांचा अपमान केला आहे. मी एक डॉक्टर असून माझ्या आयुष्यात मी अनेकांना मदत केली. परंतु त्याचा कधी देखावा केला नाही किंवा माझ्या मदतीचा कुठलाही व्हिडिओ व्हायरल केला नाही. याउलट बांगर हे लोकांना मदत करून व्हिडिओ करीत त्यांच्या गरिबीची थट्टा उडवत आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर आलेल्या महापुरात लोकांना मदत केल्याचे सोंग यांनी केले. प्रत्यक्षात बांगर यांच्यामुळेच शासकीय अधिकाऱ्यांना मदत करण्यात अडथळा निर्माण झाला होता. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बांगर यांनीच अधिकाऱ्यांना थांबवलं. माझे व्हिडिओ आणि ड्रोन येऊ द्या मग मदत करू असे सांगून त्यांनी अडथळा निर्माण केला.
कळमनुरी मतदार संघातील गोरगरीब जनता ऐन दिवाळीत आजही कामासाठी बाहेर जात आहे. मग तुम्ही कोणता विकास केला? यांनी जर खरोखर विकास केला असता तर आज पैसे वाटायची गरज का पडली असती. महिला भगिनींना कुठल्याही सुविधा नाहीत. उलट त्यांना पैसे वाटून त्यांचा अपमान केल्या जात आहे. हजार नाही पाच हजार वाटले तरी काही फरक पडणार नाही. माझ्याकडे पैसे कमी आहेत पण प्रेम जास्त आहे.
बांगर यांनी स्वतःच सांगितले होते शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्याच्या अंगावर कधीही गुलाल पडणार नाही आणि ही गोष्ट खरी झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी जनताच गद्दारला धडा शिकवेल अशी टीकाची झोड देखील त्यांनी यावेळी उठवली.


मी सर्व समाज आणि जाती धर्माला घेऊन चालणारा माणूस आहे. त्यामुळे कळमनुरी विधानसभेतील जनतेने आपले मत वाया घालू नये. मताचे विभाजन करण्यासाठी जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जाईल याचा जनतेने विचार करून मतदान करावे असे आवाहन देखील संतोष टारफे यांनी केले. यावेळी संपर्क प्रमुख बबन थोरात, खासदार नागेश पाटील अष्टीकर, जिल्हाप्रमुख गोपू उर्फ अजय सावंत, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, आमदार प्रज्ञा सातव, बाळासाहेब मगर, दिलीपराव चव्हाण, जकी कुरेशी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार रॅलीला मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्यामुळे महाविकास आघाडीत उत्साह निर्माण झाला आहे.

Tags: #kalmnuri_vidhansabha#santosh_bangar#santosh_tarfe#ubt
Previous Post

मुटकुळे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल

Next Post

पक्षाचा राजीनामा, उमेदवारी कायम !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
पक्षाचा राजीनामा, उमेदवारी कायम !

पक्षाचा राजीनामा, उमेदवारी कायम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!