Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

पक्षाचा राजीनामा, उमेदवारी कायम !

गंभीर आरोपासह बॉम्बस्फोट

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
October 29, 2024
in राजकारण, हिंगोली
0
पक्षाचा राजीनामा, उमेदवारी कायम !
0
SHARES
631
VIEWS

हिंगोली- भारतीय जनता पार्टीचे नेते रामदास पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत घेत आपण भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रामदास पाटील यांनी आज त्यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी यापूर्वीच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते अर्ज कायम ठेवतील की माघार घेतील याबाबत मोठी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर आज रामदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले. जिल्ह्यामध्ये होत असलेल्या जलजीवनच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानंतर मुटकुळे यांनी संबंधित सरपंचांवर दबाव आणून त्यांना आपले काम करण्यासाठी बांधील केल्याचा आरोप त्यांनी केला. हिंगोली नगरपालिकेमध्ये झालेल्या विकास कामांचे श्रेय नगरसेवकांना देण्याऐवजी ते श्रेय स्वतःकडेच घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला. पक्षांतर्गत बूथ लेवल पर्यंत काम करणाऱ्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम मुटकुळे यांनी कधीही केले नाही. मतदार संघातील अनेक गावांमध्ये भांडणे लावण्याचे काम त्यांनीच केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विरोधकांसोबत हात मिळवणी करून अभद्र स्वरूपाची युती देखील करण्यात आली परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांचा सगळा मनसुबा उधळून लावला. लोकसभा निवडणुकीमध्ये तानाजी मुटकुळे हे स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु ते शक्य न झाल्यानंतर त्यांनी बाबुराव पाटील यांना उभे केले. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या विजयासाठी मुटकुळे यांनी कुठलेही योगदान दिले नाही असा गंभीर आरोप देखील यावेळी रामदास पाटील यांनी केला.
डावे आणि उजवे मराठा यांच्या नावावर मुटकुळे आणि गोरेगावकर यांनी राजकारण केले. प्रत्यक्षात या दोन्हीही समाजातील कार्यकर्ते किंवा नेत्यांना मोठे होण्यासाठी दोघांनीही काहीही केलेले नाही. गोरेगावकर यांचे पंधरा वर्षे आणि मुटकुळे यांचे दहा वर्ष हे केवळ मतदारसंघातील राजकारण खेळण्यामध्ये गेले आहे. त्यामुळे कंटाळलेली जनता माझ्या पाठीशी राहणार असून महाराष्ट्रातील मोठ्या मताधिक्यांनी अपक्ष म्हणून निवडून येणारी ही माझी जागा असेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags: #bjp#hingoli_bjp#hingoli_vidhansabha#tanaji_mutkuleramdas_patil
Previous Post

प्रचार सभेत टारफे यांची तुफान फटकेबाजी

Next Post

भव्यशक्ती प्रदर्शनाने भाऊ पाटील यांचा अर्ज दाखल

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
भव्यशक्ती प्रदर्शनाने भाऊ पाटील यांचा अर्ज दाखल

भव्यशक्ती प्रदर्शनाने भाऊ पाटील यांचा अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!