Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

गद्दार विकल्या जातो निष्ठावान नाही – उद्धव ठाकरे

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 9, 2024
in राजकारण, हिंगोली
0
गद्दार विकल्या जातो निष्ठावान नाही – उद्धव ठाकरे
0
SHARES
451
VIEWS

कळमनुरी – गद्दार विकल्या जात असतो निष्ठावान विकल्या जात नाही. त्यामुळे आजही माझ्यासोबत असलेले निष्ठावान गद्दारांना अशा रसातळाला नेऊन पोचवतील की त्यांनी स्वप्नात देखील पुन्हा गद्दारीचा विचार करू नये अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळमनुरी येथील जाहीर सभेमध्ये बोलताना केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार संतोष टार्फे यांच्या प्रचारार्थ आयोजित असलेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी घानाघाती भाषण केले. मी या ठिकाणी गुंडगिरीवर नांगर फिरवायला आलो आहे. अशा गद्दार लोकांना उमेदवारी देताना मला यांची लायकी माहिती नव्हती. उमेदवारी देणे ही माझीच चूक होती आणि त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. परंतु मला या व्यक्तींचे नाटक नंतर माहीत होत गेली. पैशाने विकल्या गेलेले हे गद्दार पुन्हा निवडून येऊ देऊ नका. माझ्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्याला न्याय देण्याचे काम मी केले, हळद संशोधन केंद्र तात्काळ मंजूर करण्याचे काम माझ्या हातून झाले. परंतु त्यानंतर या गद्दार सरकारने महाराष्ट्रात केवळ भ्रष्टाचाराचा विचार केला. हिंगोली सारख्या जिल्ह्यात आजही सिंचन बंधारे आणि शेतीपूरक उद्योगांची नितांत गरज असताना या ठिकाणी केवळ दादागिरी माजवण्यात आली. माझ्यासोबत असलेले निष्ठावान शिवसैनिक ही दादागिरी मोडून काढतील. महिलांना बहीण म्हणून जे पैसे देत आहात आणि त्याची जी जाहिरात करीत आहात याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पैशातून बहीणचे मतदान विकत घेण्याचा हा प्रकार आहे. सत्ता स्थापनेनंतर गद्दार आणि गद्दार यांना मदत करणारे अशा सर्वांनाच आपण जेलची हवा दाखविणार असल्याची घोषणा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. या सभेला खासदार नागेश पाटील आष्टीकर, महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष टार्फे, रूपालीताई पाटील गोरेगावकर, जयप्रकाश दांडेगावकर , आमदार प्रज्ञा सातव, संपर्कप्रमुख बबन थोरात, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, विनायक भिसे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व मतदार संघातून शेकडोंच्या संख्येने आलेले शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: #santosh_bangar#santosh_tarfe#ubt_shivsena
Previous Post

सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे महायुतीचे सरकार स्थापन व्हावे -पंकजा मुंडे

Next Post

मुटकुळे यांनी जारी केला स्वतःचा संकल्प पत्र !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
मुटकुळे यांनी जारी केला स्वतःचा संकल्प पत्र !

मुटकुळे यांनी जारी केला स्वतःचा संकल्प पत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!