Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

मुटकुळे यांनी जारी केला स्वतःचा संकल्प पत्र !

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 12, 2024
in राजकारण, हिंगोली
0
मुटकुळे यांनी जारी केला स्वतःचा संकल्प पत्र !
0
SHARES
838
VIEWS

हिंगोली- महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत हिंगोली विधानसभे करिता स्वतःचा संकल्प पत्र जाहीर केला.
महायुतीच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकताच राज्याचा संकल्प पत्र जारी करण्यात आला. त्या पाठोपाठ आज हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला संकल्पपत्र जाहीर केला. त्या अनुषंगाने हिंगोली शहराकरिता नुकतीच 84 कोटी रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून ती येत्या पाच वर्षात पूर्ण केल्या जाईल. त्याचबरोबर पैनगंगा नदीवरील अकरा बंधार्‍यांसाठी 787 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी मिळाली आहे. हिंगोली येथील प्रस्तावित मेडिकल कॉलेज देखील सुरू करण्यात आले आहे. उर्वरित महापुरुषांचे स्मारक हिंगोली शहर व सेनगाव शहरात उभे करण्यात येणार आहे. बासंबा व रिसाला बाजार रेल्वे उड्डाणपूल देखील येत्या पाच वर्षांमध्ये पूर्ण केल्या जाईल. हिंगोली शहरातील सिरेहक शाह बाबा तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. इंदिरा फुले नाट्यगृह व खुराणा पेट्रोल पंप समोरील जागा विकसित करण्यात येईल. अग्रसेन चौक ते नरसी चौक व स्वर्गीय नानाजी देशमुख उड्डाणपूल चौपदरीकरण देखील करण्यात येईल. कयाधू नदीवरील उड्डाणपूल बांधण्यात येईल. संत भगवान बाबा उद्यान विकासाकरिता शासनाकडून एक कोटी 15 लक्ष मंजूर करून सदरील कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे.
येलदरी धरणातून डावा कालवा काढून सेनगाव तालुक्याची सिंचन व्यवस्था करण्यात येईल. गाव तेथे व्यायामशाळा, क्रीडांगण, वाचनालय व स्मशानभूमी उभारण्यात येईल. शेतीकडे जाणारे पाणंद रस्ते 100% करण्यात येतील तसेच आवश्यक त्या ठिकाणी गावांमध्ये जोड रस्ते निर्माण करण्यात येतील. अशी घोषणा त्यांनी संकल्प पत्राच्या माध्यमातून केली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, दुर्गादास साकळे यांची उपस्थिती होती.

Tags: #bjp_hingoli#hingoli_vidhansabha#tanaji_mutkule
Previous Post

गद्दार विकल्या जातो निष्ठावान नाही – उद्धव ठाकरे

Next Post

रामदास पाटील यांची प्रचारात जोरदार मुसंडी !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
रामदास पाटील यांची प्रचारात जोरदार मुसंडी !

रामदास पाटील यांची प्रचारात जोरदार मुसंडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!