Sunday, October 11, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

नियुक्ती प्रशासकीय, कारभार तांत्रिक !

जि.प.बांधकाम विभागातील अजब प्रकार उघड

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
July 30, 2026
in प्रशासन, हिंगोली
0
नियुक्ती प्रशासकीय, कारभार तांत्रिक !
0
SHARES
269
VIEWS

हिंगोली – जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, प्रशासकीय पदावर कार्यरत असलेला अधिकारी थेट तांत्रिक संचिकांवर स्वाक्षऱ्या आणि टिप्पणी करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अधिकारक्षेत्राच्या स्पष्ट मर्यादा असतानाही हा प्रकार सुरू असल्याने विभागातील शिस्त आणि कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नियमाप्रमाणे बांधकाम विभागातील तांत्रिक संचिका संबंधित तांत्रिक अधिकारी (श्रेणी १, २ किंवा ३) तसेच लेखाधिकारी यांच्या तपासणीनंतरच कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केल्या जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय जबाबदारीसाठी रुजू झालेला एक अधिकारी स्वतःला सर्वेसर्वा समजून थेट तांत्रिक संचिकांवर स्वाक्षरी व निरीक्षण नोंदवत असल्याचे उघड झाले आहे.

शासकीय नियमांनुसार कोणताही अधिकार नसताना हा हस्तक्षेप नेमक्या कोणत्या उद्देशाने केला जात आहे, याबाबत प्रशासनात संभ्रमाचे वातावरण आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या मनमानी आणि हेकेखोर वृत्तीमुळे विभागातील अनेक कर्मचारी वैतागले असून, कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

यामुळे प्रशासकीय आणि तांत्रिक कार्यपद्धतीतील सीमारेषा धूसर होत असून, जबाबदाऱ्यांची गल्लत होत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारामुळे भविष्यातील कामकाजात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित प्रकाराची चौकशी करावी आणि नियमबाह्य हस्तक्षेपावर लगाम लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.

(बातमीत वापरले चित्र प्रातिनिधिक ए आय आधारित आहे)

Tags: #Bandhakam_Vibhag_Zilha_Parishad#Vivek_Gaikwad#zilha_parishad_Hingoli
Previous Post

धूळवाटेवरचे दिवस’ व ‘पुरेसे हे अपुरेपण’चे प्रकाशन

Next Post

खा. वडकुतें सोबत मोदींनी मारल्या मनमोकळ्या गप्पा !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
खा. वडकुतें सोबत मोदींनी मारल्या मनमोकळ्या गप्पा !

खा. वडकुतें सोबत मोदींनी मारल्या मनमोकळ्या गप्पा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!