सेनगाव -तालुक्यातील कोळसा येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सव सुरू झाला असून शंकरपटाच्या स्पर्धा दोन दिवस घेण्यात येणार आहेत. तसेच खंडोबा यात्रा महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सव सुरू झाला असून आज दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जंगी शंकरपटाचे उद्घाटन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिसोड मालेगाव चे आमदार अमित झनक ,सचिन नाईक , भास्कर बेंगाळ, बाबा नाईक , परमेश्वर मांडगे, दिलीप देसाई, दिनकर देशमुख, माजी शिक्षण सभापती संजय भैय्या देशमुख, सुनिल पाटील गोरेगावकर, द्वारकादास सारडा, पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे, पंजाब वडकुते, आदींची प्रमुख उपस्थिती होती.












