Saturday, October 10, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मनोज जरांगे यांची गुरूवारी विराट सभा

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
December 6, 2023
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
मनोज जरांगे यांची गुरूवारी विराट सभा
0
SHARES
14
VIEWS
हिंगोली :
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी डिग्रस कर्‍हाळे फाटा येथे 110 एकरवर सभा पार पडणार आहे. या विराट सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याची सभा डिग्रस कर्‍हाळे फाटा येथे 7 डिसेंबर रोजी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला मनोज जारांगे पाटील हिंगोली येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत, यावेळी दोन क्रेनच्या माध्यमातून 2 क्विंटलचा हार घालण्यात येणार आहे. तसेच 101 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. 110 एकवर ही सभा पार पडणार असून सभेसाठी 40 बाय 20 व 12 फुट उंचीचे मुख्यस्टेज तयार करण्यात आले आहे. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 11 फुट उंच पुतळा ठेवण्यात येणार आहे. स्टेज भोवती 50 फुटांचा डि झोन तयार करण्यात आला असून दुसर्‍या स्टेजवर सभा सुरू होण्यापुर्वी पोवाडे व निवडक मुलींचे भाषण होणार आहेत. या सभेसाठी 200 भोंगे, आठ डी.जे.बॉक्स, 300 फोकस, सहा ड्रोन कॅमेरे, आठ एलईडी वॉल, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निगराणी ठेवण्यासाठी चार टेहळणी टॉवर, सहा मुख्यप्रवेशद्वार असे स्वरूप असणार आहे. सभा सुरळीत पार पडावी यासाठी पाच हजार मराठा सेवक ( स्वयंसेवकांची ) नियुक्ती केलेली आहे. दोन वेळेस प्रशिक्षण देऊन प्रत्येक स्वयंसेवकांना ओळखपत्र व टिशर्ट दिले जाणार आहे. 50 विविध ठिकाणी या स्वयंसेवकांची नियुक्‍ती करून त्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. या सर्व स्वयंसेवकांना सभेच्या एक दिवस अगोदर 6 डिसेंबर रोजी मुक्‍कामी सभास्थळी बोलावण्यात येणार आहे.  त्याचबरोबर 4 लाख पाणीबॉटल व 50 टॅंकरद्वारे फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभा ठिकाणी समन्वयरावा म्हणून 50 वाकी टाकीची व्यवस्था आहे. 150 एकरवर पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून पार्किंगस्थळी व इतर ठिकाणी असे 40 अन्नछत्राचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये खिचडी, पुरीठेचा, चपाती ठेचा, चिवडी, उपमा अशा प्रकारे 300 क्‍विंटलचे अन्नछत्र राहणार असून याशिवाय बिस्कीट पुडे व केळीचेही वाटप करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जनसमुदायाचा विचार करता  तज्ञ डॉक्टरांसह संपूर्ण आपत्कालीन वैद्यकीय सुविधांसह सुसज्ज असे मेडिकल कॅम्प विविध पाच ठिकाणी लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये एकुण 400 डॅाक्टर्स व सहयोगी कर्मचाऱ्यांसह असणार आहेत. तसेच 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 रूग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक झोन नंतर 30 फुटाचे आपत्कालीन रस्ते तयार करण्यात आले आहेत. 2 अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत. महिलांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावोगावी जनजागृती व्हावी यासाठी मराठा समाज बांधवांच्या घरोघरी जावून 3 लाख मुळपत्रिका वाटण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लहान – मोठे 400 बॅनर जिल्हाभरात लावण्यात आले आहेत. या सभेसाठी 12 विविध समित्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. जिल्हा कार्यवाहक समिती, प्रशासकीय जबाबदारी समिती, प्रसिद्धी प्रमुख समिती, स्टेज व ग्राऊंड समिती, साऊंड सिस्टीम व फोकस समिती, आरोग्य विभाग समिती, स्वयंसेवक नियंत्रण व समन्वयक समिती, पिण्याचे पाणी नियोजन समिती, पार्किंग नियोजन समिती, बॅनर समिती, अन्नछत्र विभाग समिती, स्वच्छता विभाग समिती, विद्युत पुरवठा जनरेटर समिती, हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा अभिवादन समिती अशा विविध समितीच्या माध्यमातून या विराट सभेचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने 5 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे.
Tags: manoj jarange
Previous Post

शिंदे समिती बरखास्त करा- छगन भुजबळ

Next Post

रोजगारक्षम शिक्षणासाठी एमकेसीएल कटीबद्ध -विना कामत

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
रोजगारक्षम शिक्षणासाठी एमकेसीएल कटीबद्ध -विना कामत

रोजगारक्षम शिक्षणासाठी एमकेसीएल कटीबद्ध -विना कामत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!