Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

हिंगोली येथून जनशताब्दी एक्सप्रेस

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
March 4, 2024
in प्रशासन, महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
अर्ध्या हळकुंडात पिवळे !
0
SHARES
184
VIEWS

हिंगोली – गेल्या अनेक वर्षांपासून हिंगोलीकरांची मागणी असलेली थेट मुंबई रेल्वे अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मंजूर करीत जालना येथून धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस 8 मार्च पासून हिंगोली येथून धावणार असल्याचे जाहीर केले. यासंदर्भातची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली येथील पत्रकार परिषदेत दिली.
हिंगोली येथून थेट मुंबईला जाण्यासाठी रेल्वे असावी याकरिता हिंगोलीकरांनी अनेक वेळा निवेदने दिली. त्याचबरोबर रेल्वे रोको आंदोलन देखील करण्यात आले होते. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर दानवे यांनी जालना ते मुंबई धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली येथून सोडण्यास मंजुरी दिली. 8 मार्चपासून ही रेल्वे हिंगोली येथून धावणार आहे. रेल्वेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी ही रेल्वे हिंगोली येथून सकाळी पाच वाजता निघून दुपारी दोन वाजता मुंबई येथे पोहोचणार आहे. त्यामुळे हिंगोलीकरांना मुंबई आता काही तासाच्या अंतरावर आली आहे. सदर रेल्वेला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे. हिंगोलीकरांसाठी ही मोठी उपलब्ध असून गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यात यश आले याबाबत समाधान वाटत असल्याची भावना व्यक्त करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार देखील खासदार हेमंत पाटील यांनी मानले.

Tags: #hemant_patil #hingoli_lokasabhaHingoli LoksabhaHinigoli PressIndian Railway
Previous Post

पुढचाही खासदार हेमंत पाटील हवाच !

Next Post

येलदरीचे पाणी जिल्ह्याला मिळणार

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
येलदरीचे पाणी जिल्ह्याला मिळणार

येलदरीचे पाणी जिल्ह्याला मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!