Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

यंदा तरी मंत्रिपदाची प्रतीक्षा संपणार का ?

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
December 6, 2024
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
यंदा तरी मंत्रिपदाची प्रतीक्षा संपणार का ?
0
SHARES
171
VIEWS

हिंगोली- मराठवाड्यातील क्षेत्रफळाने छोटा समजला जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपदाची प्रतीक्षा राहिलेली आहे. यंदाच्या मंत्रिमंडळात तरी जिल्ह्यातील आमदाराची वर्णी लागेल काय? असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पदरात भरभरून मतदानाचे माप टाकले.


हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांना जनतेने सलग तिसऱ्यांदा संधी दिली. मागील दहा वर्षात मुटकुळे यांनी विकासाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण काम केले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये मंत्री म्हणून नवा चेहरा देण्याच्या बाबतीत विचार होईल काय? याबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. मराठवाडा विभागाचा विचार केला तर विभागात भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज मंडळी प्रतीक्षा यादीत आहेत. परंतु नवा चेहरा म्हणून पक्षाने मुटकुळे यांना संधी द्यावी अशी आग्रहाची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

माजी खासदार हेमंत पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. शिवाय हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील बहाल केला आहे. राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून हेमंत पाटील ओळखले जातात. शिवाय एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या अतिशय विश्वासातील व्यक्ती म्हणून देखील हेमंत पाटील यांची ओळख आहे. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटासाठी विजय खेचून आणण्यात हेमंत पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मंत्री कोट्यातून हेमंत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


वसमत विधानसभे मधून आमदार राजू भैया नवघरे यांना जनतेने सलग दुसऱ्यांदा पसंती दिली आहे. युवा चेहरा आणि दमदार नेतृत्व म्हणून अजितदादा गटातील आमदारांमध्ये त्यांची ओळख आहे. राजकारणात दिग्गज मानले जाणारे आणि नवघरे यांचे गुरु जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव करून नवघरे यांनी मोठा पराक्रम केला आहे. मराठवाड्यातील त्यांचा हा विजय अजित पवार गटासाठी उल्लेखनीय ठरणारा आहे. या पराक्रमाबद्दल अजित पवार गटातून त्यांना मंत्रीपदाची संधी मिळावी अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.


कळमनुरी विधानसभेकडे संपूर्ण मराठवाडा विभागाचे लक्ष होते. ज्यामध्ये खुद्द उद्धव ठाकरे यांनी कळमनुरी मतदार संघा संघात सभा देखील घेतली होती. परंतु सर्व विरोधाला पुरून उरत संतोष बांगर यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. शिंदे गटातील आक्रमक चेहरा म्हणून बांगर ओळखल्या जातात. भविष्यातील शिंदे गटाचे राजकारण पाहता संतोष बांगर यांच्यासारख्या आक्रमक चेहऱ्याला मंत्रिपदाची संधी दिल्यास त्याचा मराठवाडा विभागामध्ये पक्षाला मोठा फायदा होईल अशी भावना शिवसैनिकांमध्ये जोर धरत आहे. या तीनही आमदारांचा विचार करता महायुती सरकारमधील तीन पैकी किमान एका पक्षाने तरी जिल्ह्याला यावेळी मंत्रिमंडळात नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी तमाम जिल्हा वासियांची भावना आहे. तत्कालीन आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांना शरद पवारांनी राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून संधी दिली होती. त्यानंतर आजपर्यंत जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री लाभलेला नाही. ही भावना लक्षात घेऊन महायुतीतील पक्षांनी यावेळी तरी जिल्ह्याचा मंत्रीपदाचा अनुशेष दूर करावा अशी इच्छा व्यक्त होऊ लागली आहे.

Tags: #bjp#eknath_shinde#mahayuti#NCP_AJITDADAShivsena
Previous Post

व्यापारी आणि कामगार यांना संरक्षण देण्यास कटिबद्ध- रामदास पाटील

Next Post

शोषण की पोषण देणारा मंत्री ?

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
यंदा तरी मंत्रिपदाची प्रतीक्षा संपणार का ?

शोषण की पोषण देणारा मंत्री ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!