हिंगोली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या हस्ते सुजय देशमुख यांची मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली.
यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे, जिल्हाध्यक्ष बि.डी. बांगर, हिंगोली शहराध्यक्ष केशव दुबे आदींची उपस्थिती होती.
वरिष्ठांनी आपल्यावर जो विश्वास टाकून नियुक्ती केली आहे ती सार्थ ठरविण्यासाठी युवकांमध्ये पक्षाचे संघटन निर्माण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया सुजय देशमुख यांनी दिली. यावेळी अजित दादा पवार व सुरज चव्हाण यांच्या हस्ते सुजय देशमुख यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.












