हिंगोली- बहुप्रतिक्षित नगराध्यक्ष पदाची सोडत आज पार पडली. यामध्ये हिंगोली नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलांकरिता राखीव असल्याचे जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या महत्त्वकांक्षावर पाणी पडले तर काहींना या माध्यमातून गृहमंत्री मैदानात उतरवून संधी मिळणार आहे.
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आज राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत यांच्या आरक्षणाच्या सोडती जाहीर करण्यात आल्या. हिंगोली नगर परिषदे करिता नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलांकरिता राखीव म्हणून जाहीर झाले आहे. यामुळे नगराध्यक्ष पदाकरिता उतरणाऱ्या काही मत्ताबरांचे स्वप्न धुळीस मिळाले आहेत तर ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या मतदारांना निवडणुकीत मात्र स्वतःच्या गृहमंत्र्यांना अध्यक्षपदाकरिता उभे करावे लागणार आहे. त्यामुळे एकंदर नामधारी नगराध्यक्ष जनतेच्या वाट्याला येईल.
यांच्या नावाची जोरदार चर्चा
गेल्या काही दिवसांपासून हिंगोली शहरांमध्ये अध्यक्ष पदाकरिता भाजपमधून बाबाराव बांगर, शिवसेना शिंदे गटाकडून श्रीराम बांगर यांच्यासह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातून दिलीप चव्हाण, नेहाल भैय्या, जगजीत राज खुराणा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. आरक्षण जाहीर झाल्यामुळे यातील बाबाराव बांगर व श्रीराम बांगर यांच्या पत्नी मैदानात उतरण्याची शक्यता वरती दिली जात आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, उद्धव ठाकरे शिवसेना गट उमेदवारांच्या बाबतीत काय पत्ते उघडतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसातील वातावरण पाहता युती किंवा आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.












