Sunday, October 11, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home मुंबई

अखेर ठरलं..गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
October 12, 2025
in मुंबई, राजकारण, हिंगोली
0
अखेर ठरलं..गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !
0
SHARES
388
VIEWS

हिंगोली- गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या विविध पक्षातील प्रवेशाच्या शक्यतांना अखेर पूर्णविराम मिळाला. गोरेगाव येथे झालेल्या समर्थकांच्या बैठकीत भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी 14 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.
हिंगोली विधानसभेचे तब्बल तीन वेळा आमदार म्हणून कार्यकाळ पार पडलेल्या भाऊराव पाटील गोरेगावकर यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. काँग्रेस पक्षाचे निष्ठावानेते म्हणून त्यांच्या परिचय असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ऐनवेळी जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला सोडून दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढविली. निवडणुकीनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यापूर्वी देखील त्यांची शिवसेना शिंदे गटात प्रवेश होण्यासंदर्भात चर्चा झाली होती. परंतु गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी चर्चा विनिमय सुरू होते. परंतु गोरेगावकर यांचे विरोधक असलेले प्रकाश थोरात, अनिल पतंगे या व इतर मंडळींकडून गोरेगावकर यांच्या प्रवेशाच्या बाबतीत मोठा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झाला होता. त्यामुळे गोरेगावकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर मोठ्या चर्चांना वेग आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज गोरेगाव येथे समर्थकांची बैठक घेऊन प्रवेशाच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर अखेर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, संचालक यांच्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत भगवा फडकवू
कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले की कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर आपण हा प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: #bhaurao_patil_goregavkar#shivasena
Previous Post

ऐकावे ते नवलच !

Next Post

गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!